बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी कशी करायची? बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन
- या योजने अंतर्गत नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- होमपेज वर गेल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी असा पहिलाच ऑप्शन मिळेल. त्यावर ती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- आधार क्रमांक भरायचा आहे.
- मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि Process to Form या बटनावर क्लिक करायचे आहे.
- आत्ता तुमच्या समोर बांधकाम कामगार नोंदणी अर्ज ओपन होईल.
- त्यामध्ये खालील विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल.
- Personal Details / वैयक्तिक माहिती
- Permanent Address / कायमचा पत्ता
- Family Details / कौटुंबिक तपशील
- Bank Details / बँक तपशील
- Employer Details / नियोक्ता तपशील
- Details of the 90 Days Working Certificate / ९० दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील
- Supporting documents / समर्थन दस्तऐवज
- वरील सर्व माहिती भरून Save बटनावर क्लिक करायचं आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करावा लागेल.