पीएम किसान ई-केवयासी यादी आली या यादीत नाव असेल तरच मिळणार 2000 हजार रुपये

eKYC कशी करायची?

eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.

आता पीएम किसान योजनेसाठी eKYC करायची असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

ही वेबसाईट उघडल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल.

“eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. OTP Based eKYC is available on PMKISAN Portal. You may also contact nearest CSC centres for Biometric authentication based eKYC. Deadline of eKYC for all the PMKISAN beneficiaries has been extended till 31st August 2022.”

– अशी ही सूचना आहे.

याचा अर्थ पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. ओटीपी बेस्ड ई-केवायसीची सुविधा पीएम किसानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. eKYC करण्यासाठीची मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.

eKYC करण्यासाठी इथं 2 पर्याय सांगितलेत.

एक म्हणजे जर तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही Aadhar based OTP authentication वापरून eKYC करू शकता. त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC या पर्यायावर क्लिक करा. पण, जर तुम्हाला Biometric authentication करायचं असेल, तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल.

आता यातला पहिला पर्याय म्हणजे आधार कार्ड वापरून eKYC कसं करायचं ते पाहूया.

यासाठी तुम्हाला Farmers Corner मधील eKYC या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर Aadhar Ekyc नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

इथं सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा क्रमांक आणि पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

हे टाकून झालं की समोरच्या Search या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. इथं सुरुवातीला तुमचा आधार नंबर दिसेल. त्यापुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे.

मोबाईल नंबर टाकला की पुढच्या Get OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. म्हणजेच काही आकडे पाठवले जातील. ते तुम्हाला इथल्या OTP या रकान्यात टाकायचे आहेत.

मग पुढे असलेल्या Submit for Auth या रकान्यात क्लिक करायचं आहे.

त्यानंतर EKYC is Sucessfully Submitted असा मेसेज तिथं येईल. याचा अर्थ तुमची EKYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ही सेवा सरकारनं काही दिवसांपूर्वीच सरकारनं सुरू केली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला Record not found किंवा Invalid OTP यासारखे पर्याय येतील. वारंवार प्रयत्न करुनही हे पर्याय येत असल्यास सीएससी सेंटरवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

कारण यासाठी आता केवळ दोनच दिवसांचा वेळ शिल्लक आहे.

 

पीएम किसान ई-केवयासी १ली आणि २री यादी इथे क्लिक करून केवायसी करा

                    👇👇👇👇

👉👉👉यादीत आपले नाव पहा 👈👈👈