कांदाचाळ साठी मिळणार 1.60 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

कांदाचाळ खर्चाचे स्वरूप (रुपयांत)

अकुशल (६० टक्के)…९६,२२०

कुशल (४० टक्के)…६४,१४७

मनरेगा अंतर्गत एकूण…१,६०,३६७

अतिरिक्त कुशल खर्चासाठी लोकवाटा…२,९८,३६३

कांदाचाळीसाठी एकूण खर्च…४,५८,७३०

यांना मिळणार लाभ :

कांदा चाळीची रुंदी ३.९० मी, लांबी १२.०० मी व

उंची २.९५ मी. जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत असेल.

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायीकरीत्या शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येऊ शकेल. कांदाचाळ उभारण्यासाठी पंचायत, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पणन विभाग हे सर्व विभाग कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. ही बाब विचारत घेऊन साठवणूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा राज्यातील कांदा उत्पादकांना निश्चित फायदा होणार आहे. त्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.
– संदीपान भुमरे, मंत्री, रोजगार हमी योजना व फलोत्पादन