Talathi Bharti Recruitment 2023

Talathi Bharti Recruitment 2023
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण 4,625 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. 17 ऑगस्ट 2023 ते दि. 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे.

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.
⇒ पदाचे नाव: तलाठी.

⇒ एकूण रिक्त पदे: 4625 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

⇒ शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

⇒ वेतन/ मानधन:रु, 25,500/- ते रु. 81,100/-.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.

⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: जून २०२३.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: जुलै २०२३.

अर्ज करण्याची पद्धती :- ऑनलाइन (प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे ऑनलाइन मागविण्यात येत आहेत.

 

तलाठी भरती २०२३ प्रारूप जाहिरात प्रसिद्ध

Click Here to Download PDF

तलाठी भरती २०२३ अंतर्गत जिल्हानिहाय पदसंख्या

येथे क्लिक करा

तलाठी परीक्षा 2023 चा अभ्यासक्रम डाउनलोड करा

येथे क्लिक करा

तलाठी भरती २०२३ साठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची माहिती

येथे क्लिक करा

महाराष्ट्र तलाठी भरती नवीन GR जाहीर

येथे क्लिक करा

 

पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-
पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी/ बाद) होण्याची शक्यता आहे.

पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.