Post Office Scheme | दररोज 50 रुपये जमा करून एकाच वेळी 35 लाख मिळवा | पोस्ट ऑफिस स्कीम मराठी | post office double scheme 2021

Post Office Scheme, ग्राम सुरक्षा योजना माहिती मराठी

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस योजना भारतातील सर्व पोस्ट ऑफिसांमध्ये उपलब्ध आहे,आणि या योजनांचे सर्वात प्रमुख उदाहरण म्हणजे PPF, हि योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या 8200 शाखांमध्ये तसेच भारतातील प्रत्येक शहरातील,गावातील पोस्ट ऑफिस मध्ये चालवली जाते, ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचा 1 भाग आहे. ही विमा पॉलिसी 1995 मध्ये देशातील ग्रामीण लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत 10 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत र्गुंतवणूक करता येते. प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

 

 

Post Office Scheme

ग्राम सुरक्षा योजनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत दर महिन्याला 1,515 रुपये म्हणजेच दररोज केवळ 50 रुपये गुंतवगुंतवले तर त्याला 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यास, 55 वर्षापर्यंत तुम्हाला 1,511 रुपये प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत ही योजना घेतली तर तुम्हाला दरमहा 1463 रुपये आणि 60 वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा 1411 द्यावे लागतील, तुमचा प्रीमियम चुकल्यास, तुम्ही तो ३० दिवसांच्या आत जमा करू शकता, जर तुम्ही या योजनेच्या परताव्यावर नजर टाकली तर, गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये, 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.