“या” नागरिकांना राशन धान्य ऐवजी मिळणार 9 हजार

कोणत्या जिल्ह्यासाठी ही योजना आहे पाहा ?

ज्या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांकरिता ही योजना सुरु केली आहे. त्या जिल्ह्याची नावे खाली दिली आहेत.

वाशिम
यवतमाळ
वर्धा
अमरावती
बीड
लातूर
हिंगोली
औरंगाबाद
जालना
उस्मानाबाद
परभणी
नांदेड
बुलढाणा
अकोला
लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार?

या योजनेंतर्गत, तुमच्या कुटुंबात पाच लोक असल्यास, तुम्हाला दरमहा 750 रुपये आणि वर्षाला 9000 रुपये, तर एका व्यक्तीला दरमहा 150 रुपये मिळतील.

 

लाभार्थ्यांना कसे पैसे मिळतील?

कुटुंबातील सर्व सदस्यांचे रेशनचे पैसे कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील. यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे लागेल.

लाभार्थींना मिळालेल्या पैशातून ते गहू किंवा तांदूळ खरेदी करू शकतात किंवा वाचवलेले पैसे लाभार्थी त्यांच्या गरजेनुसार वापर करू शकतात.

रेशन कार्डधारकांना रेशन ऐवजी पैसे ही योजना कोण राबवित आहे?

राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मार्फत अन्न व नागरी पुरवठा विभाग ही योजना सुरु करत आहे.

ही योजना राज्यात लवकरच सुरू होणार आहे. यासंदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय येत्या मंत्री मंडळाच्या बैठकीत लवकरच जाहीर होणार आहे.