Rain Update | राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, कोणत्या जिल्ह्यास दिला अलर्ट

काय आहे पावसाचा अंदाज

पुणे परिसरात रविवारी दिवसभर पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस असणार आहे. हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराडमध्येही रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील चार दिवस पाऊस असणार आहे. कोकणातही पुढील चार दिवस मुसळधार पाऊस असणार आहे.

 

पुणे परिसरातील धरणे भरली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 97% म्हणजेच 28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे परिसरातील टेमघर वगळता इतर सर्व धरणे भरले आहेत. पुणे परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पुणे शहर आणि घाट परिसरात चांगला पावासाची शक्यता व्यक्त केली आहे.