पेरणी यंत्रासाठी मिळणार ५० टक्के अनुदान : अर्ज कुठे करावा ? वाचा संपूर्ण
Agriculture Mechanization Scheme : देशातील खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे. अशात आता शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या (Kharif Season) तयारीची लगबग सुरू झाली आहे.
मशागतीपासून ते पेरणीपर्यंच्या (Sowing) कामांसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. परंतु, दिवसेंदिवस शेती कामांसाठी मजुरांची टंचाई (Labor Shortage) भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यांत्रिकिकरणाकडे वळताना दिसत आहेत.
अधिकाधिक शेतकऱ्यांनी शेती कामांसाठी यांत्रिकिकरणाचा वापर करावा, यासाठी महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकिकरण योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदीसाठी अनुदान ही योजना राबवण्यात येत आहे.
पेरणी योजने अंतर्गत (Perni Yantra Yojana) शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजना २०२२-२३ साठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये सर्व कृषी यंत्रांसाठी ५० ते ८० टक्के एवढे अनुदान दिले जाणार आहे. Agriculture Mechanization Scheme
कृषी यांत्रिकिकरण योजनेमध्ये सर्व कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर तसेच ट्रॅक्टरचलित अवजारांसाठीही अनुदान देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून बीबीएफ यंत्र खरेदी करण्यासाठीही अनुदान दिले जाते.
योजनेसाठी असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ॉनलाईन अर्ज करावा लागणारा आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या www. MahaDBT.com संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत. पेरणी यंत्रासाठी मिळणार पेरणी यंत्रासाठी मिळणार
source : agrowon