शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा पैसे जमा होण्यास सुरुवात 1.25 कोटी शेतकऱ्यांना सरसकट लाभ | Pik Vima Yojana Date 2023

शेतकरी मित्रांनो तुम्हीदेखील पीकविमा भरून आता पीकविमा लाभार्थी रक्कमेच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी आता हि चांगली बातमी आहे राज्य सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना सरसकट २५% रक्कम देण्याचे जाहीर केले असून नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झालेला असून पहिल्या टप्प्यात सुमारे १.२५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील तब्बल १ कोटी 70 लाख आणि ६७ हजार शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजेच २०२३ ला आपला पिक विमा भरला होता.यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ १ रु.मध्ये पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि उर्वरित सर्व रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळेच यावर्षी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा भरला होता.

 

पिक विमा योजनेची रक्कम खात्यावर कधी जमा होणार ?

शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरसकट पिक विमा लाभ दिला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी त्याचसोबत जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील केली होती.बीड,लातूर,नांदेड यासोबत अनेक जिल्ह्यांत सरसकट पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.परंतु शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी विमा कंपन्यांना अद्याप राज्य सरकार कडून पैसे मिळाले न्हवते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी विमा कंपन्या गप्प बसल्या होत्या परंतु आता विमा कंपन्यांना सरकार कडून निधी वितरीत करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 novembar २०२३ पर्यंत पिक विम्याचे पैसे जमा होतील असे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी सांगितले आहे त्यामुळे आता राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना नवरात्र उत्सवातच चांगला लाभ सरकार कडून दिला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.

 

१.२५ कोटी लाभार्थी शेतकरी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा