Kanda chal Anudan आता कांदा चाळीला 1 लाख 60 हजार अनुदान – रोहयो मंत्री संदीपान भुमरे

Kanda chal Anudan: नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखामद्धे कांदा चाळ योजना 2022 या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. कांदा चाळ योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण या लेखामद्धे बघणार आहोत.

शेतकरी बंधुंनो कांदा चाळ योजना संदर्भात mahadbt web portal ऑनलाईन अर्ज मागवून त्यांना सोडत पद्धतीने लाभ दिला जाणार आहे या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.मंत्री भुमरे म्हणाले की खरीप हंगामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो किंवा रांगडा हंगामातील कांदा साठविला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना माफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो.

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

कांदा हे एक जिवंत पीक आहे. त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला ४५-६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ‘कांदाचाळ’ च्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री भुमरे पुढे म्हणाले अकुशल ६० टक्के प्रमाणे ९६ हजार २२० रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च, कुशल ४० टक्केच्या मर्यादेत ६४ हजार १४७ रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत मजुरी अधिक साहित्याचा खर्च एकूण १ लाख ६० हजार ३६७ रूपये (एक लक्ष साठ हजार तीनशे सदुसष्ठ) इतके अनुदान मिळणार आहे. उर्वरित रक्कम २ लाख ९८ हजार ३६३ रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून कांदाचाळीसाठी एकूण खर्च ४ लाख ५८ हजार ७३० रुपये येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment