Post Office Scheme : पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त रिटर्न, जाणून घ्या…

Post Office Scheme: तुम्हाला सुरक्षित आणि निश्चित स्वरूपातील परतावा हवा असेल, तर पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. या योजना भारत सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येतात. त्यामुळे यातील गुंतवणुकीची हमी सरकार घेते. कोणत्या आहेत त्या योजना, जाणून घेऊयात.

 

Post Office Saving Schemes: अनेकांना पैसे कुठे गुंतवायचे हा मोठा प्रश्न असतो. गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळेल की नाही. तसेच आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या  या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळेल. 5 लाखांची गुंतवणूक करा आणि फक्त व्याजातून 2 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतील. मात्र, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

 

 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF)

भारत सरकारने 1968 साली लोकांना गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) चालू केली. या योजनेत किमान 500 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. याचा गुंतवणूक कालावधी सुरुवातीला 15 वर्षाचा असून त्यानंतर प्रत्येकी 5 वर्षाचा आहे. यातील गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला 7.1 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. ही योजना पूर्णतः EEE कॅटेगरीमधील आहे.

 

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

खास मुलींसाठी केंद्र सरकारने 2015 साली सुकन्या समृद्धी योजनासुरू केली. या योजने अंतर्गत 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने पालक गुंतवणूक करू शकतात. या खात्यात किमान 250 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.  याच मॅच्युरिटी कालावधी हा 21 वर्षाचा असून यामध्ये सर्वाधिक 8 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. ही योजना देखील EEE कॅटेगरीमध्ये येत असून यामध्ये कर सवलतीचा लाभ घेता येतो.

 

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC)

पोस्टाकडून चालवण्यात येणारी आणखी एक जोखीममुक्त गुंतवणूक योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना. या योजनेत गुंतवणूकदाराला 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. या योजनेत 1000 रुपये भरून गुंतवणूक सुरू करता येते. याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षाचा आहे. या योजनेत गुंतवणूक करून कर सवलत मिळवता येते. आयकरच्या 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सवलत मिळवता येते.

 

टाईम डिपॉझिट योजना (TD)

पोस्टाची आणखी एक जोखीममुक्त योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना. या योजनेत 1,2,3 आणि 5 वर्षासाठी गुंतवणूक करता येते. या योजनेत किमान 1000 रुपये तर कमाल गुंतवणूक मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या योजनेत 6.9 टक्क्यांपासून ते 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. या योजनेत 1.5 लाख रुपायांपर्यंतची गुंतवणूक कर सवलतीस पात्र आहे. मात्र यातील व्याज 40 हजार रुपयांहून अधिक असेल, तर मात्र TDS भरावा लागू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना व्याजाची मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली आहे.

 

किसान विकास पत्र योजना (KVP)

पोस्टाकडून चालवण्यात येणारी किसान विकास पत्र योजना देखील 100 टक्के सुरक्षित असून यामधील परतावा हा निश्चित स्वरूपातील आहे. या योजनेत 7.5 टक्के व्याजदर मिळत असून याचा मॅच्युरिटी कालावधी 115 महिन्यांचा आहे. या योजनेत किमान 1000 रुपये, तर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

 

 

Grihalakshmi Yojana: घरातील महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये मिळणार; या तारखेपासून गृहलक्ष्मी योजना सुरू होणार..!!

Leave a Comment