NEET UG Results 2023: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नीट यूजीची परीक्षा 7 मे 2023 रोजी घेण्यात आली होती. आज 13 जून रोजी निकाल जाहीर झालाय. तामिळनाडूच्या प्रबंजन जे आणि बोरा वरुण यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. नीट यूजीसाठी 2087462 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 499 शहरातील 4097 केंद्रावर परीक्षा पार पाडली. 14 परीक्षा केंद्र देशाबाहेरही होते. मराठी, हिंदी, गुजरातीसह 13 भाषांमध्ये नीट परीक्षा पार पडली होती.
१.७७ लाख वैद्यकीय जागा
या वर्षी देशभरातील १.७७ लाख वैद्यकीय जागांसाठी २० लाखांहून अधिक उमेदवार NEET UG परीक्षेला बसले होते. उपलब्ध जागांच्या संख्येच्या आधारे सर्वजण त्यांच्या श्रेणीनुसार उच्च वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात. वैद्यकीय शिक्षणासाठी देशात सुमारे १ हजार वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यात सुमारे अडीच लाख जागा आहेत.
भारतातील टॉप १० फार्मसी कॉलेजेस
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद
जामिया हमदर्द, दिल्ली
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी
जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, ऊटी
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, मोहाली
जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, म्हैसूर
पंजाब विद्यापीठ, चंदीगड
मणिपाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, मणिपाल
अमृता विश्व विद्यापीठ, कोईम्बतूर
NTA NEET UG 2023 Exam Result