Gold Loan Information in Marathi | सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती, नियम, कागदपत्रे, प्रक्रिया येथे पहा

Gold loan information in Marathi: रोजच्या आयुष्यात काही वेळा आपल्याला आर्थिक अडचणी येतात. सर्वसाधारण मनुष्य अशा वेळांसाठी बचत, गुंतवणूक करतच असतो. पण काही अडचणी अचानक समोर येवून उभ्या राहतात, जसे मेडिकल इमर्जन्सी. तर काही वेळेस आपली तयारी कमी पडते, जसे घर घेणे, मुलांच्या शाळा- महाविद्यालयात प्रवेशाचा प्रश्न असो किंवा इतर काही. अशा अचानक उद्भवणाऱ्या खर्चांसाठी तुम्ही काय कराल? कारण थोड्या पैशांसाठी आपल्या स्वप्नातील घर सोडून देणे किंवा मुलांना आवडत्या कोर्स, कॉलेजमध्ये प्रवेश न मिळणे आपण कदापि मान्य करणार नाही. बरोबर आहे, एखाद्याकडे उसने मागाल किंवा वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन घ्याल. पण यात काही अडचणी येवू शकतात. मग यावर उपाय काय? तर गोल्ड लोन म्हणजे सोने तारण ठेवून घेतलेलं कर्ज.

 

गोल्ड लोन म्हणजे काय ?

मित्रांनो, गोल्ड लोन म्हणजे तुमचं सोनं तारण म्हणून ठेवून त्याच्या बदल्यात एक ठराविक रक्कम कर्ज म्हणून घेणे. आणि गरज संपल्यावर ती मूळ रक्कम आणि व्याज ठरवलेल्या कालावधीत परतफेड करून आपले सोने परत घेणे. मित्रांनो, सोने तारण कर्ज खूप सोप्या पध्दतीने व कमी वेळात मिळत असल्याने लोकांमध्ये गोल्ड लोन घेणे लोकप्रिय झाले आहे. तसेच सोने तारण कर्ज हे एक सुरक्षित कर्ज मानले जाते.

गोल्ड लोन मध्ये तुमचे सोने हे बँके कडे गहाण ठेवले जाते व बँक सोन्याच्या एकूण रकमेपैकी 70 ते 75% रक्कम कर्ज म्हणून तुम्ही घेऊ शकता. तसेच ठराविक कालावधीत या कर्जाची परतफेड करून तुम्ही तुमचे सोने बँकेतुन सोडवून आणू शकता. महत्वाचे म्हणजे सोने तारण कर्ज घेताना तुम्हाला त्याचे कारण विचारले जात नाही. म्हणजेच हे कर्ज वापरण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. तुम्ही हे कर्ज कोणत्याही कारणासाठी वापरू शकता. जसे की शिक्षणासाठी, लग्नासाठी, किंवा इतर काही कारणांसाठी.

मित्रांनो, सोन्यावर कर्ज घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. की जर तुम्ही ठराविक कालावधीत कर्जाची परतफेड केली नाही तर बँक तुमचे सोने परस्पर विकू शकते. या परिस्थितीत तुम्हाला तुमचे सोने परत कधीच मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही कधी सोने तारण कर्ज घेणार असाल तर ते वेळीच फेडा. किंवा तुम्ही हे कर्ज दिलेल्या वेळेत फेडू शकणार असाल तरच सोने तारण कर्ज घ्या. 

 

गोल्ड लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची ओळखपत्र तसेच पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक असते.

2) पॅन कार्ड आवश्यक असते.

3) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा फोटो असणे बंधनकारक आहे. जेणेकरून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची ओळख नेहमी पटेल.

 

गोल्ड लोन साठी असणाऱ्या काही नियम व अटी

मित्रांनो, तुम्ही गोल्ड लोन तसेच इतर कोणतेही कर्ज घेतात तेव्हा त्या सर्व बँकांच्या काही नियम व अटी असतात.

1) कर्ज घेत असताना नेहमी सर्व कागदपत्रे नीट वाचून घ्यावीत.

2) बँकेने दिलेल्या अटी व शर्ती यांचे नेहमी पालन करावे.

3) प्रत्येक बँकेचा व्याजदर हा वेगळा असतो.

 

गोल्ड लोन साठी बँकांचे व्याजदर किती आहेत

  • स्टेट बँक ऑफ इंडिया 7.50%
  • बँक ऑफ इंडिया 8 %
  • बँक ऑफ बडोदा 9%
  • बँक ऑफ महाराष्ट्र 7%
  • पंजाब नॅशनल बँक 7%

वरील प्रमाणे दिलेली माहिती ही काळानुसार बदलू शकते. त्यामुळे आपण बँकेमध्ये जाऊन एकदा खात्री करून घ्यावी वरील प्रमाणे दिलेले सर्व माहिती ही फक्त शैक्षणिक हेतूने दिलेली आहे.

Leave a Comment