Solution for drying clothes : पावसाळ्यात ओलसर कपड्यांना कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, कपडे राहतील एकदम फ्रेश

Solution for drying clothes: एकदा पाऊस सुरू झाला की ३-४ दिवस थांबायचे नाव घेत नाही. गेला महिनाभर पावसाची आतुरतेने वाट पाहणारे आपण आता पाऊस कधी थांबणार याची वाट पाहायला लागलो. मागील ४ दिवसांपासून सूर्याने दर्शनही न दिल्याने वातावरणात सतत ओलावा आहे. या काळात एक महत्वाची अडचण होते ती म्हणजे ओले कपडे कपडे वाळण्याची. काही वेळा हे कपडे पावसाने ओले झालेले असतात तर काही वेळा ऊन न पडल्याने धुतलेले ओले कपडे वाळलेलेच नसतात. इतकेच नाही तर कपाटात किंवा बाहेर असलेल्या कपड्यांनाही दमट हवामानामुळे कुबट वास यायला लागतो (5 Remedies to Get Rid from Bad Smell of Cloths in Monsoon) . 

 

एकदा कपड्यांना वास यायला लागला की तो कसा घालवायचा असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. यामध्ये अगदी आतल्या कपड्यांपासून, टॉवेल, घरात वापरायचे कपडे, बाहेरचे कपडे अशा सगळ्याच प्रकारच्या कपड्यांचा समावेश असतो. कपड्यांचा हा वास सहज जाणारा नसतो, त्यामुळे असे कपडे वापरताना किंवा अंगात घातल्यावर अंगालाही त्याचा वास येतो आणि आपल्या आजुबाजूच्यांनाही अगदी सहज हा वास येऊ शकतो. असे वास असलेले कपडे अंगावर घालणे त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नसते. आता कपड्यांना येणारा हा कुबट वास घालवण्यासाठी नेमके काय करायचे हे समजून घेऊया. घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास हा वास निघून जाण्यास फायदा होतो, पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे.

 

 

आता बघू या कुबट वास येऊ नये म्हणून काय करावे ?

कपडे सुखवण्यासाठी पंख्याचा वापर करा. कपडे सुकण्यासाठी पंख्याचा वापर करु शकता. पंख्याखाली कपडे सुकण्यास ठेवा. याकरता हँगरचा वापर करा. यामुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होते. तसेच एकाद्या मोकळ्या खोलीत कपडे सुकत घाला. त्याठिकाणी सुगंधित अगरबत्ती लावा. यामुळे कपड्यांचा कुबट वास जाण्यासाठी मदत होईल.

कपडे धुण्यासाठी घरगुती कोणत्या गोष्टी वापरता येतील ?

लिंबाच्या रस: कपडे धुण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करणे योग्य ठरेल. लिंबू हे एक नैसर्गिक आम्लयुक्त आहे. यामुळे कपड्यांची दुर्गंधी जाण्यासाठी मदत होते. कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.

व्हिनेगर: खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या व्हिनेगरचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी व्हिनेगर चांगले कार्य करते. यामुळे कपड्यांचा कुबट वास दूर होण्यास मदत होते. कपडे धुताना व्हिनेगर वापरावे. यामुळे कपड्यांचा कुबट वास दूर होतो.

बेकिंग सोडा: जेवणात वापरला जाणारा खाण्याचा सोडा देखील यावर एक रामबाण उपाय आहे. खाण्याचा सोडा दुर्गंधी घालवण्यास मदत करतो. याकरता एक बादली पाण्यात १ चमचा खाण्याचा सोडा टाकावा आणि त्यात कपडे भिजत घालावे यामुळे कपड्यांचा कुबट वास जाण्यास मदत होते.

सुगंधित डिटर्जंट: कपडे धुताना सुगंधित डिटर्जंटचा वापर करा. यामुळे कपड्यांची दुर्गंधी जाऊन कपड्यांना छान सुगंध येतो. तसेच कपडे धुताना सुगंधित द्रव्याचा वापर करा. याचा चांगला फायदा होतो.

मिठ: तुमच्या वॉर्डरोबमध्ये एका कोपऱ्यात मिठानं भरलेली पिशवी ठेवावी. ही पिशवी केवळ ओलावाच शोषून घेत नाही तर कपडे देखील कोरडे ठेवण्यास मदत करते.

डांबर गोळ्या: कपाटात प्रत्येक खणात डांबर गोळ्यांचा वापर करा. यामुळे चांगला सुगंध येतो आणि कपड्यांना कुबट वास येत नाही.

Leave a Comment