E Shram Card Yojana Maharashtra : ई श्रम कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा लाभ योजना सुरू, असा करा अर्ज

E Shram Card Yojana Maharashtra

जय महाराष्ट्र मित्रांनो, देशातील सर्व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने श्रम कार्ड ही योजना आणली आहे. या योजनांमध्ये कामगारांनी श्रम कार्ड काढल्यास त्यांना अनेक सुविधा व लाभ मिळत आहेत. मित्रांनो तुम्ही जर कामगार असाल तर तुम्हीही श्रम कार्ड आत्ताच काढून घ्या याचे फायदे भविष्यात तुम्हाला खूप होणार आहेत.

ई श्रम कार्ड धारकांना दोन लाख रुपयांचा फायदा योजना

मित्रांनो ई श्रम कार्ड ही योजना विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कामगारांसाठी व कष्टकऱ्यांसाठी आहे. श्रम कार्ड काढल्यास तुम्हाला दोन लाख रुपयाचा अपघात विमा मिळत आहे यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही. फक्त श्रम कार्ड काढल्या नंतर तुम्हाला हा विमा आपोआप मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही.

ई-श्रम कार्डाचे फायदे काय?

ई-श्रम कार्ड हे आधारसोबत लिंक करण्यात आलं आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.

भविष्यात सर्व सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ याच पोर्टलद्वारे दिला जाणार असल्याचं सरकारनं सांगितल केलं आहे.

Leave a Comment