Talathi Bharti Exam Date: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट पासून पेपर…

Talathi Bharti Exam Date: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट पासून पेपर…

 

पुणे : Talathi Recruitment Exam भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

 

परीक्षा टप्पे

पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट

दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

परीक्षा ठिकाण विद्यार्थांना त्यांच्या मेल आयडी व मेसेज द्वारे कळवण्यात येतील, त्यानंतर हॉल तिकीट महाभुमी च्या अधिकृत संकेस्थळावर उपलब्ध होतील.

संदर्भ: लोकसत्ता

 

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून  पहा

Police Constable Admit Card 2023: पुलिस कॉन्स्टेबल भर्ती परीक्षा का एडमिट कार्ड जारी, ऐसे करें डाउनलोड

Leave a Comment