Aadhaar Card Link : लक्ष द्या ! 1 जुलैपर्यंत घरबसल्या 2 मिनिटात आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट अन्यथा मिळणार नाहीत सरकारी योजनेचा लाभ

PAN Aadhaar Card Link: भारतात भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड (Aadhar Card) एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. आधार कार्ड शिवाय भारतात साध एक सिम कार्ड देखील काढणं अलीकडे अशक्य झालं आहे. आधार कार्ड भारतीय नागरिकांचा एक ओळखीचा, रहिवाशीचा महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड प्रत्येक सरकारी कामात नव्हे नव्हे तर खाजगी कामात ग्राह्य धरल जाणार सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट मानल जात.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे भारतातील महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. ही ओळखपत्रे केवळ ओळखपत्र म्हणून वापरली जात नाहीत,

तर ते आयकरसारख्या आर्थिक बाबींसाठी आणि सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेण्यासाठीही वापरतात.

 

 

प्रत्येक आर्थिक काम पूर्ण करण्यासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. आयकर रिटर्न भरण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत किंवा मालमत्ता खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

त्यामुळे जर तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल, तर 30 जूनपर्यंत हे काम पूर्ण करा. अन्यथा यानंतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. या संदर्भात आयकर विभागाने ट्विट करून लोकांना सतर्क केले आहे.

 

 

 2 मिनिटात असे करा 

आधारकार्ड अपडेट 

 

 

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य

प्राप्तिकर कायदा, 1961 अंतर्गत, देशातील प्रत्येक नागरिक ज्याला 1 जुलै 2017 रोजी पॅन कार्ड वाटप केले गेले आहे आणि त्या लोकांना आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे.

PAN आणि आधार लिंकिंगची अंतिम मुदत 30 जून 2023 रोजी संपणार आहे. मात्र यापूर्वी ही अंतिम मुदत 31 मार्च 2023 अशी निश्चित करण्यात आली होती.

तथापि, नंतर 28 मार्च रोजी, वित्त मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली होती की करदात्यांच्या सोयीसाठी, पॅन आधार लिंकिंगची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

जर तुम्ही ही तारीख चुकली तर तुम्हाला या कामासाठी 1000 रुपये दंड भरावा लागेल.

दुसरीकडे, जर 30 जूनपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही, तर तुमचा पॅन देखील अवैध होईल.

 

 

 2 मिनिटात असे करा 

आधारकार्ड अपडेट

 

पॅन कार्ड अवैध ठरल्यास हे मोठे नुकसान होईल

जर तुम्ही 30 जूनपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही आणि अशा परिस्थितीत पॅन कार्ड अवैध

 ठरले तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होईल. पॅन कार्डशिवाय तुम्ही आयकर रिटर्न भरू शकणार नाही.

दुसरीकडे, जर तुम्ही शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला तिथेही समस्यांना सामोरे जावे लागेल. याशिवाय,

पॅन कार्ड अवैध झाल्यास, व्यक्तीला कर लाभ आणि क्रेडिट सारखे फायदे मिळणार नाहीत आणि बँक कर्ज देखील घेऊ शकणार नाहीत.

Leave a Comment