LIC kanyadan Scheme : LIC ची सरल पेन्शन योजना इमिजिएट एन्यूटी प्ल्रॅन आहे. म्हणजेच यामध्ये पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागेल. ही एकल प्रीमियम पेन्शन योजना आहे. ही पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जी पेन्शन मिळेल, तीच पेन्शन आयुष्यभर असेल. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला पेन्शनसाठी वयाच्या 60 वर्ष होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.
या योजनेअंतर्गत तुम्हाला वयाच्या 40व्या वर्षीही पेन्शन मिळू लागते. हा प्लॅन घेण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिले सिंगल लाइफ ,ज्यामध्ये पॉलिसी एखाद्याच्या नावावर असेल. त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मूळ प्रीमियमची रक्कम दिली जाईल. दुसरा पर्याय म्हणजे जॉइंट लाईफ पॉलिसी. यामध्ये पती-पत्नी दोघेही लाभ घेऊ शकतात. प्रथम प्राथमिक पेन्शनधारकाला पेन्शन मिळेल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शन दिली जाईल. जर दोघांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नॉमिनीला मूळ प्रीमियमची रक्कम दिली जाईल.
काय आहेत पात्रतेचे निकष-
किमान 40 वर्षे आणि कमाल 80 वर्षे वयाच्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये पेन्शनधारक जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळते. ही पॉलिसी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर कधीही बंद केली जाऊ शकते. पेन्शन कधी घ्यायची ते पेन्शनधारक 4 पर्यायांमधून निवडून ठरवतात. तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांतून एकदा पेन्शन घेऊ शकता.
कोणाला किती पेन्शन मिळेल-
या स्कीमअंतर्गत तुम्हाला किमान 1,000 रुपये प्रति महिना किंवा 12,000 रुपये वार्षिक पेन्शन घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला अडीच लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये जास्तीत जास्त पेन्शन घेण्याची मर्यादा नाही. 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम भरून तुम्हाला दरवर्षी 50250 रुपये पेन्शन मिळू शकते. लक्षात ठेवा यासाठी तुम्ही येथे 40 वर्षांचे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, 1 लाख रुपयांच्या वार्षिक पेन्शनसाठी तुम्हाला 20 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.
योजनेबद्दल महत्वाची माहिती-
या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला पहिल्या 6 महिन्यांनंतर कर्ज मिळू लागेल. तुम्ही 6 महिन्यांनंतर योजनेतून बाहेर पडू शकता. यामध्ये दरवर्षी 5 टक्के निश्चित व्याज मिळते. तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्हाला पेन्शन मिळेल. यामध्ये कोणताही मॅच्युरिटी लाभ नाही कारण ही योजना खातेदार जिवंत असेपर्यंत चालते.