Pankaja Munde : सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ;पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातली खदखद

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (7 जुलै) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मीडियात होणाऱ्या त्यांच्याविषयीच्या उलटसुलट चर्चांचा खुलासा केला.

माझ्या राजकीय भूमिकांशी प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला असल्यामुळे मी कन्फ्युज झाले आहे. मी राजकारणात आल्यापासून वीस वर्षं सुट्टी घेतली नाही. मला आता एक-दोन महिन्यांच्या ब्रेकची गरज आहे. मला अंतर्मुख होण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणारे एक मंत्री होते धनंजय मुंडे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं अगदी स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंतचं विरोधाचं राजकारण आता नवीन नाही. 2019 मध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता.

त्यामुळे धनंजय मुंडे यांना भाजपने सोबत घेतल्यानंतर पंकजा यांची कोंडी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याचबरोबर त्या कोणत्या पक्षात जाणार, याविषयीही चर्चा सुरू होत्या.

मात्र याबाबत आता पंकजा मुंडे यांनी आपली भूमकिा स्पष्ट केली आहे. त्या भाजपमध्येच राहणार असून आपला पक्ष सोडून त्या जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्या जरा स्पष्टच बोलल्या.

पंकजा मुंडे यांनी अखेर काँग्रेसप्रवेश करण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत ही अफवा असल्याचं सांगितलं. मी माझा पक्ष सोडून जाणार नाही. मी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले नाही.

पण स्वतः पंकजा यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्याला पूर्णविराम दिला.

पंकजा मुंडे यांनी त्यांच्याबद्दल अशा चर्चा का सुरू आहेत, यावरही भाष्य केलं. ते करत असताना त्यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, अनेक पदांबाबत चर्चा सुरू होते. त्या पदावर माझी नियुक्त होईल असं सांगितलं जातं. त्याच्या बातम्या येतात. परंतु त्या पदावर माझी नियुक्ती होत नाही. मग मी पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात. परंतु यात माझा काहीच दोष नाही. यावर खरंतर पक्षाने उत्तर द्यायला हवं. संबंधित पदावर पंकजा मुंडे पात्र असतील-नसतील ते पक्षाने सांगावं. कारण याचं उत्तर मी किती वेळा देणार, मी ते देऊ शकत नाही.

सर्वात मोठी बातमी ! मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

Leave a Comment