मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी केलेली आघाडी, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी केलेली हातमिळवणी, वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी केलेली युती आणि आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत केलेला प्रवेश यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे.
Shivsena MNS Alliance: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे यांच्या गटाला युतीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला असल्याचं सूत्रांंनी सांगितलं आहे
मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.
राजकीय चर्चा नाही
राजकीय चर्चेचा संबंध नाही. संजय राऊत यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. सत्याचा राजकीय अर्थ काढू नये. मी काही प्रस्ताव घेऊन आलेलो नाही. मला संजय राऊत यांनीच राजकारणात आणलं होतं. मला पर्सनल गोष्टीसाठी भेटायचं होतं. माझं काही काम होतं. बरेच दिवस त्यांना भेटलो नव्हतो. मी त्यांच्या घरीच जाणार होतो. पण ते सामनात असल्याचं कळलं म्हणून सामनात आलो,असंही ते म्हणाले.
राज यांच्या पाठी उभे राहा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का? या प्रश्नावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. माझ्या वाटण्यावर काही होत नाही. राज ठाकरे यांनी आधीच काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांना युती आणि आघाड्यात रस नाही. राजकारणात जे काही चाललं आहे, मतदान कुणाला केलं आणि कोण राज्यात आलं. राज ठाकरे महाराष्ट्राचं भविष्य आहे आणि या क्षणाला महाराष्ट्राने राज ठाकरे यांच्या पाठी उभं राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.
राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतील का?
राज आणि उद्धवमधले मतभेद टोकाचे असले तरी त्यांच्यात एक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं चित्रही वारंवार दिसलं आहे. उद्धव ठाकरेंची तब्येत बिघडली तेव्हा राज त्यांना भेटायला गेले होते, तर राज यांची EDकडून चौकशी होत असताना, उद्धव यांनी त्यांची पाठराखण केल्याचं दिसलं.
“काही गोष्टी लोकांना दाखवण्यासाठी केल्या जातात. जिव्हाळा अर्थातच असेल कारण ते दोघं भाऊ आहेत. पण शेवटी भाजपच्या नेत्यानं मला सांगितलेलं, जिथे राजकीय मतभेद असतात तिथे कदाचित दोन व्यक्ती किंवा पक्ष एकत्र येऊ शकतात. पण जिथे दोघांच्या संबंधांमध्ये घृणा, तिरस्कार, मत्सर असतो, तेव्हा या प्रक्रियेत कुठेतरी बाधा येते.”
राज आणि उद्धवमधले राजकीय मतभेद आणि मनभेद असले तरी शिवसेना आणि मनसेमधल्या अनेक समर्थकांना दोघं भाऊ आणि त्यांचे पक्ष एकत्र येतील, अशी आशा वाटते. पण धवल यांना सध्या तरी असं होताना दिसत नाही.
“शिवसेना आणि मनसे या दोन वेगळ्या संघटना आहेत. त्यांचं एकत्रीकरण हे दोन्ही पक्षांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं आणि ते तितकंसं सोपं नाहीये.”