Gas Cylinder Price: सरकारचं आणखी एक गिफ्ट! व्यावसायिक सिलेंडच्या दरात मोठी कपात, किती झाला स्वस्त?

LPG Gas Cylinder Price Cut: स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी एलपीजीच्या किंमतीत 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

नवीन किमती १ सप्टेंबर पासून लागू

1. एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सूट मिळेल –
केंद्रीय मंत्रिमंडळाने एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आधीपासून मिळत असलेल्या 200 रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त हा लाभ स्वतंत्रपणे मिळेल. अशा परिस्थितीत, या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 400 रुपयांचा लाभ मिळणार आहे. ऑगस्टमध्येच सरकारने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही सप्टेंबरमध्ये सिलेंडर बुक कराल तेव्हा तुम्हाला प्रति सिलेंडर 200 रुपये कमी द्यावे लागतील.

 

 

सिलिंडरच्या दरात खुप दिवसांनी कपात करण्यात आली.

विशेष म्हणजे महिलांसाठी सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी घरगुती गॅसच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. त्याच वेळी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी किंमत प्रति सिलिंडर 400 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

 

pmmvy scheme : मोदी सरकार महिलांना देत आहे 6 हजार रुपये : पहा तुम्हाला कसा मिळणार लाभ…!

Leave a Comment