ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा, मतदानाची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचे अपडेट्स

Grampanchayat Election 2023:  जानेवारी २३ नंतर मुदत संपलेल्या राज्यातील २३५९ सार्वत्रिक आणि ३०८० पोट निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने कार्यक्रमा जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार (ता. २०) पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असून रविवारी (ता. पाच नोव्हेंबर) रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ता. सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. Grampanchayat Election तेथे ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका का रखडल्या आहेत?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, त्यापूर्वी ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्याने, अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. जाहीर झालेल्या ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. तसेच मविआ काळात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता.Grampanchayat Election या नव्या वॉर्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

 

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा दिनांक – सोमवार (ता. १६)
  • नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक – शुक्रवार (ता. २०)
  • नामनिर्देशपत्र छाननी दिनांक, सोमवार (ता. २३)
  • नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक, बुधवार (ता. २५) वेळ दुपारी ३ पर्यंत
  • निवडणूक चिन्ह वाटप दिनांक – बुधवार (ता. बुधवार) दुपारी ३ नंतर
  • मतदान दिनांक – रविवार (ता. पाच नोव्हेंबर)
  • मतमोजणी दिनांक – सोमवार (ता. सहा नोव्हेंबर)

Leave a Comment