soybean rate 2023: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; सोयाबीन दरात मोठी वाढ

आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabin Bazar bhav Today, Soybean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारभाव मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव. सोयाबीन बाजारात गेल्या आठवड्यात आपल्याला काहीशी तेजी-मंदी पाहायला मिळाली त्यामध्येच भाव हे सुमारे सहा हजार रुपयांच्या दरम्यान बहुतांश बाजार समित्यांमध्ये स्थिरावले होते.

 

सोयाबीन बाजार भाव soybean rate पुरवठा यंदा विक्रमी पातळीवर पोहोचला. मागील हंगामातील जवळपास 25,00,000 टन सोयाबीन शिल्लक होतं, तर यंदा सोयाबीन उत्पादनही वाढलं. पण चालू हंगामातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये सोयाबीनची बाजारातील आवक आणि गाळप ही वाढल्याचं सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं म्हटलंय, मग या तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी किती सोयाबीन विकलं आणि या सोबतच सोयापेंड उत्पादन आणि निर्यात किती झाली याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवट्पर्यंत पहा.

 

 

आजचे सोयाबीन बाजारभाव

 

 

यंदा सोयाबीन आवक 25 टक्‍क्‍यांनी वाढली सोयाबीन बाजार भाव soybean rate

सध्या देशातील सोयाबीन हंगाम सुरु होऊन आता तीन महिन्याचा कालावधी झाला. आता देशातील बाजारात सोयाबीनची आवक आणि गाळप वाढलं. यंदाच्या हंगामात ऑक्टोबर महिन्यापासून सोयाबीनची आवक वाढली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातील बाजारात 50,00,000 टन आवक झाली तर मागील हंगामात याच काळातील सोयाबीन आवक 40,00,000 टनांवर होती. म्हणजे यंदा सोयाबीन आवक जवळपास 25 टक्के नी वाढलं, असं सोपा स्पष्ट केलाय.

Leave a Comment