महाराष्ट्रातील आजचे कापुस बाजार भाव: काही जिल्ह्यांमध्ये कापूस बाजार भाव वाढ

Today cotton rate : यावेळ कापसाला किमान ₹10,000 प्रति क्विंटल दर मिळावा, अशी शेतकर्यांची अपेक्षा असली तरी बाजार आणि मंदी विचारात घेता हे दर प्रतिक्विंटल 7200 च्या आसपास स्थिर राहतील जागतिक मंदीमुळे दरवाढीची शक्यता मावळली असून कांद्याचे दर हे सरकीच्या दरातील चढ उतारावर अवलंबून राहतील, असा अंदाज शेतमाल बाजारातनी व्यक्त केलाय.

 

सन 2023-2024 च्या हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ₹7020, तर मध्यम धाग्याच्या कापसाची एमएसपी ₹6620 जाहीर केली आहे. सध्या सरकीचे दर ₹3000 प्रतिक्विंटल असल्याने कापसाला प्रतिक्विंटल 7000 ते ₹7300 दर मिळत आहे.

 

आजचे कापसचे भाव येथे पहा 

 

सरकीचे दर कमी अधिक झाल्यास कापसाचे दर सरासरी ₹200 प्रती क्विंटलने कमी अधिक होतील.
जागतिक बाजारात तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दरात घसरण सुरू आहे. महागाई नियंत्रणाच्या नावाखाली केंद्र सरकार खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करीत असून तेलबियांचे दर नियंत्रित करीत असल्याने,प्रसिद्ध सरकीच्या ढेपेला दूधकांडी हा स्वस्त पर्याय बाजारात उपलब्ध सरकीचे दर वाढण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे कापसाचे दर प्रतिक्विंटल ₹7200 च्या आसपास राहणार असल्याचे जिनिंग व्यावसायिक विजय यांनी सांगितले तर कापसाला सरासरी ₹7500 दर मिळणार असल्याचा अंदाज कापूस महासंघाची माजी व्यवस्थापक वैराळ यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment