ST Corporation Yojana: मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र, भारतातील राज्य-मालकीची बस सेवा प्रदान करणारी सर्वात जुनी आणि विश्वासार्ह प्रणाली आहे. जी प्रवाशांच्या फायद्यासाठी अनेकदा विविध प्रवास योजना आणि उपक्रम राबवत असते.
खास प्रवासासाठी प्रवाशांना प्रवासासाठी सुद्धा ‘आवडेल तेथे प्रवास’ अश्या नावाची योजना काढली आहे. प्रवाशांसोबत स्नेह , मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे त्याचप्रमाणे कमी खर्चात विविध ठिकाणी जसे पर्यटन स्थळे , धार्मिक स्थळे फिरता यावी या हेतू खाली त्यांनी प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास हि योजना प्रस्थापित केली.
या योजनेमध्ये सात दिवसाच्या पासप्रमाणे चार दिवसाचा पास ही दिला जाणार आहे. खाजगी ट्रॅव्हलिंग कंपनी त्यांच्या सोयी सुविधा अशा विविध ट्रॅव्हलिंग त्यांच्यासोबत स्पर्धा असताना सुद्धा प्रवाशांनी आवडेल तेथे प्रवास या योजनेला उत्तमरीत्या प्रतिसाद दिला आहे. जिथे प्रायव्हेट कंपन्यांमुळे लाल परी लुप्त होण्याच्या मार्गावर होती तिथे या योजनेमुळे तिला नव्याने जन्म मिळाला आहे.
आवडेल तेथे प्रवास या योजनेचा भाग म्हणून प्रत्येक वर्षी चार दिवसांच्या पाससाठी दोन फेऱ्या किंवा दोन सीझन केले गेले. अहवालानुसार, पीक सीझन 15 जून ते 14 ऑक्टोबर ऐवजी 15 ऑक्टोबर ते 14 जून असेल. यामुळे या दोन हंगामातील दरांमध्ये फरक असेल, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
या योजनेअंतर्गत शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, एसटी लाल डब्बा इत्यादी शासकीय महामंडळाच्या गाड्या असलेल्या बसेस या प्रवासासाठी प्रवासी निवडल्या जातात. या पद्धतीत पासच्या किमतीत प्रवाशाला चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात फिरता येईल याची तरतूद करण्यात आली आहे. चार दिवसांच्या साध्या लाल एसटी पासची किंमत रु. 965 प्रति व्यक्ती, निमराम पासची किंमत रु. 1150, आणि शिवशाही पासची किंमत रु. 1205; दरम्यान, लोक चार दिवसांच्या पासला प्राधान्य देत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.
E Shram Card Yojana Maharashtra : ई श्रम कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा लाभ योजना सुरू, असा करा अर्ज